मंगळवेढा – जीवनात दीपावली सणात आनंदाचा नंदादीप सतत तेवत ठेवणे म्हणजेच दीपावली होय.दीपावली म्हणजे दीपोत्सव आनंद आणि उत्सवाची पर्वणीआहे. परंतु काळा बरोबरच अनेक बदल स्वीकारत आधुनिक काळाबरोबर अनेक बदल स्वीकारून आधुनिक झगमगाटात हायटेक व डिजिटल दीपावली साजरी झालेली आहे. परंतु यामध्ये जुन्या रुढी, परंपरा,प्रथा, संस्कृतीचे पालन करून कृषी प्रधान भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा मंगळवेढ्यातील नागणे कुटुंबियाकडून पाच दिवस घराच्या अंगणात पांडव, गवळणी घालण्याची परंपरा जपली जात आहे.
हायटेक दीपोत्सवातही भारतीय संस्कृतीच्या पाऊल खुणा जपण्याचे काम दिघे, देशमाने,सातपुते, महामुरे कुटुंबीयात आजही गायीच्या शेणाचा पांडव व गवळणीतून पाहायला मिळते.
एकादशी पासून वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी,लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा अर्थात पाडवा अशा पाच दिवस घरातील अंगणात, तुळशी वृंदावनाजवळ शेणा मातीचे पांडव, गवळणी व पेंद्या तयार केले जाते. त्याची मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. सभोवती सडासमर्जन, सुबक रांगोळी, दिव्यांची आरास केली जाते.बंगलो,प्लॉट्स जमान्यात ही परंपरा जपली जात आहे.




















