पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास कौशल्या केंद्रे व शिवाजी केंद्रे यांनी दोन लाख रुपये ची देणगी दिल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार दांपत्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी असलेल्या कौशल्या शिवाजी केंद्रे व शिवाजी भीमराव केंद्रे हे देणगीदार दांम्पत्य रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सदरची देणगी मंदिर समितीच्या अन्नछत्रास दिली. असून. केंद्रे दांम्पत्य श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे निस्सिम भक्त आहेत.
सद्यस्थितीत, कार्तिकी यात्रेचा कालावधी सुरू असल्याने भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे भाविकांकडून देणगी प्राप्त करून घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येत आहे, जादा स्टॉल उभारण्यात करण्यात आले आहेत. याशिवाय, ऑनलाईन देणगीसाठी आरटीजीएस, क्यूआर कोड, संकेतस्थळ व मोबाईल ॲपची देखील सुविधा आहे.
दरम्यान इच्छुक भाविकांना देणगी द्यावयाची असल्यास, त्यांनी श्री संत तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन देखील मंदिर समितीच्या वतीने यावेळी श्री. राऊत यांनी केले.
———————-
मागील वर्षी देखील देणगी दिली
दरवर्षी कार्तिकी यात्रेला श्रींच्या दर्शनासाठी येत असतात. मागील वर्षीच्या कार्तिकी यात्रेला देखील त्यांनी एक लाख रूपयाची देणगी दिली होती.




















