मंगळवेढा – भालेवाडी येथे मोटर सायकल रस्त्यावरुन बाजूला घेण्याच्या कारणावरुन एका 21 वर्षीय तरुणाच्या डोकीत दगड घालून गंभीर जखमी केल्याप्रकरणी प्रविण बबन जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी विशाल संभाजी दवले (वय 21 वर्षे,रा.भालेवाड) हे दि.25 रोजी सकाळी 10.30 वाजता चेतन गवळी यांच्या दुकानासमोर मोटर सायकल बाजूला लावून उभे होते. त्यावेळी आरोपीने येथे येवून मोटर सायकल बाजूला घे असे म्हणत असताना फिर्यादी हे त्याला माझी मोटर सायकल बाजूलाच आहे असे म्हणाल्याच्या कारणावरुन आरोपीने तेथे पडलेला दगड घेवून तुला लय मस्ती आली आहे असे म्हणत फिर्यादीच्या डोकीत दगड मारुन गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.


















