सोलापूर – राज्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासून तलाठी पदांची भरती प्रक्रिया रखडली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार , असा अंदाज वर्तविले जात आहे. बहुचर्चित तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल १७०० पदे आहेत. ही पदे लवकरच भरली जाणार असून त्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. वित्त विभागाची मान्यता मिळताच ती भरली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच खुशखबर मिळणार आहे..
ग्रामीण भागात शासन व जनतेचा समन्वयक म्हणून तलाठी पद महत्वाचे आहे. शेतकरी , मजूर , विद्यार्थी, गोरगरिबांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, दाखले व इतर अनेक कामासाठी तलाठी आवश्यक आहे. एकाच तलाठीवर दोन-तीन गावांची जबाबदारी आहे. त्यामुळे लवकर तलाठी भरती करण्यात यावे.
_प्रशांत शिरगुर,राज्य उपाध्यक्ष
, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन,
…
एकाच तलाठीकडे अनेक सज्जा गावांचा कार्यभार
…
राज्यात अनेक गावात तलाठी उपलब्ध नाहीत. एकाच तलाठीकडे अनेक गांवाचा कारभार असल्यामुळे कामाचा ताण येतो. अनेक मिटींग आणि इतर कामामुळे रावसाहेबाना गावांना भेट देणे अवघड होत आहे. म्हणून शासनाने लवकर तलाठी भरती करून तरूणांना सेवा करण्याची संधी द्यावे.
विक्रांत हविनाळे, प्रगतशील शेतकरी, बरूर, दालुका दक्षिण सोलापूर




















