Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समृद्धीचा बॉयलर पेटला; एप्रिलअखेर एक टीपरुही गाळपाविना राहणार नाही – सतीश घाटगे

तरुण भारतbyतरुण भारत
October 27, 2025
in maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घनसावंगी : उसाच्या राजकारणातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुक्त करण्यात यशस्वी ठरलेल्या समृद्धी साखर कारखान्याने १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाची पायाभरणी करून ‘समृद्धी’च्या दुसऱ्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली. रविवारी गाळप हंगाम २०२५-२६ च्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात, १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ संत-महंत आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांना उसाची चिंता करू नका, एप्रिलअखेर  उसाचे टीपरुही गाळपाविना राहणार नाही. अशा शब्दात कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

*या कार्यक्रमास समृध्दी कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी, बळीराम महाराज राठोड, सुरेश महाराज रामदासी, योगीराज कैलासनाथ महाराज, सतीश महाराज जाधव,  घृष्णेश्वर कारखान्याचे संचालक सतीशराव चव्हाण, प्रभाकर  पवार,  एकनाथराव दुधे, अंकुशराव उढाण, मार्केट कमिटीचे उपसभापती अरुण घुगे, संचालक बालाजी खोजे, शिवाजीराव कटारे, पांडुरंग भांगे, भाजपा तालुका प्रमुख शिवाजी मोरे, नामदेव ढाकणे, भगवान बर्वे,अनिरुद्ध झिंजुर्डे, नकुलजी तनपुरे, भगवानराव घाटूळ, बाळासाहेब बोरकर, संचालिका वैशालीताई घाटगे, रिंकीताई मेठी, ज्येष्ठ संचालक  दिलीप मामा फलके, रणजीत उढाण, अभिजित उढाण,  विकी शिंदे, जीवनराव वगरे , जीवन वगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.*

घनसावंगी-अंबड परिसरात अतिरिक्त उसाचा प्रश्न दरवर्षी चिंतेची बाब बनतो. ऊस उत्पादक शेतकरी राजकारणाचा बळी पडत असल्याने हा प्रश्न कायमचा मिटवून शेतकऱ्यांना भयमुक्त करण्यासाठी समृद्धी साखर कारखान्याने आपली क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० हजार मे. टन क्षमतेच्या दुसऱ्या युनिटसह २४ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. हे दोन्ही प्रकल्प एका वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे आणि व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी करणार आहेत. “ऊस उत्पादक शेतकरी आमच्यासाठी विठ्ठल आहेत. समृद्धी कारखाना खाजगी असला तरी त्याचे खरे मालक शेतकरीच आहेत. निवडणुका येतात-जातात, पण समृद्धी साखर कारखाना उसाचे राजकारण करत नाही, आणि करणारही नाही. कारण हा कारखाना माझं तिसरं अपत्य आहे. तो कष्टकरी कामगार- शेतकऱ्यांचे प्रेम,विश्वास आणि कष्टातून उभा राहिला आहे,” असे सतीश घाटगे यांनी स्पष्ट केले .

——–

 
समृध्दी मराठवाड्यात सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून उदयास येईल–  

“समृध्दी साखर कारखाना मराठवाड्यात सर्वाधिक भाव देणारा दुसऱ्या क्रमांकाचा कारखाना आहे. मागील वर्षी २९०० तर यावर्षी समृद्धीने २९७० रुपये  एवढा उच्चांकी भाव दिला. येणाऱ्या काळात स्व:ताचा  विक्रम मोडून समृध्दी कारखाना मराठवाड्यातला सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून उदयास येईल, असा आमचा ठाम विश्वास आहे. शेतकऱ्यांनी ऊस गाळपाची घाई करू नये, बाहेरच्या कारखान्याला ऊस देऊन आर्थिक नुकसान करू नये” असे माझे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राहील.

  -सतीश घाटगे , चेअरमन समृद्धी शुगर्स लि. 

Post Views: 45
Previous Post

तलाठीच्या १७०० जागांवर भरती प्रक्रिया कधी ? आचारसंहितेपूर्वी भरती करण्याची मागणी

Next Post

श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी मुकेश महेता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी मुकेश महेता

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1013885

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!