सोलापूर – भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहर, अनिरुद्ध पाटील मित्र परिवाराच्या वतीने सर्व घंटागाडी कर्मचारी आणि स्वच्छता दूतांना दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आपल्या शहराची स्वच्छता आणि आरोग्य टिकवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न होता, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच या उपक्रमाचं खरं यश ठरलं.
या कार्यक्रमास भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, सरचिटणीस सुधा अळीमोरे, महिला मोर्चा अध्यक्ष रंजिता चाकोते, उपाध्यक्ष साधना संगवे, माजी नगरसेवक विक्रांत वानकर आणि भाजयुमोचे विजय खुलते यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिका शाळा क्रमांक 3 देशमुख गल्ली येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी अनिरुद्ध पाटील, यतिराज होनमाने , सागर अतनुरे, विश्वनाथ प्याटी , राहुल डांगरे, सूर्यजीत सर्वगोड,शिवा कौडकी, अथर्व देशपांडे, निशांत सावळे, सुरज पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


















