सोलापूर – मध्य रेल्वेच्या वतीने विविध बहागतून ३० ऑक्टोबर पासून दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा एकूण २५ विशेष सेवा चालविणार आहे. यावेळी सोलापूर विभागातून कलबुरगि विशेष गाड्या चालणार आहेत. गाडी क्रमांक ०१४५२ कलबुरगि कोल्हापूर विशेष कलबुर्गी येथून सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटेल. यावेळी गाणगापूर, दुधनी, अक्कलकोट रोड, सोलापूर, मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, वासुद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जठ रोड, ढाळगाव, लंगरपेट, कवठेमहांकाळ, सालगरे, बेलांकी, आरग, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले असे थांबा असणार आहे.
यामध्ये चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन. अशी डब्यांची रचना असणार आहे.
गाडी क्रमांक ०१४२६ कलबुरगि दौंड अनारक्षित विशेष कलबुर्गी येथून रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. गाणगापूर, दुधनी, बोरोटी, अक्कलकोट रोड, होटगी, टिकेकरवाडी, सोलापूर, मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, केम, जेऊर, पारेवाडी आणि भिगवण या स्थानकांवर थांबेल. दहा सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामानवाहक-सह-रक्षक ब्रेकव्हॅन डबे जोडण्यात येणार आहेत.
या विशेष, गाड्यांसाठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर www.irctc.co.in सुरू आहे. या विशेष, गाडीच्या थांब्यांवरील तपशीलवार वेळापत्रकासाठी http://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एन टी ई एस ॲपचा करता येणार आहे. या विशेष, गाड्यांचा लाभ घ्यावा आणि गैरसोयी टाळण्यासाठी वैध तिकिटासह प्रवास करावा असे आवाहन रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


















