मुंबई – आदित्य ठाकरे यांना मी चांगला समजतो, त्यांनी महाराष्ट्राचा पप्पू म्हणून प्रदर्शन करू नये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगावला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सोमवारी झालेल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याप्रमाणे निवडणूक मतदार यादीतील घोळाबाबत सादरीकरण केले.वरळी विधानसभा मतदार संघात 19 हजार 333 मतदार संशयास्पद असून निवडणूक आयोग भाजपाच्या दबावाखाली काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पलटवार केला. ते म्हणाले,’ माझी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राला पप्पू आहे, असे प्रदर्शन करु नये. मी त्यांना पप्पू म्हणत नाही, ना ते आहेत असे मला वाटते. मात्र, ज्या प्रकारे राहुल गांधींनी केलं. खोदा पहाड आणि चुहा भी नहीं निकला,असे बोलायचे तेच काल आदित्य ठाकरेंनी केले, अशी बोचरी टीका ठाकरेंवर केली. तसेच, माझी अपेक्षा ऐवढीच आहे, आयोगाने उत्तरं दिली आहेत, ही लोकं पुरावा देऊ शकले नाही. माझी अपेक्षा आहे की राहुल गांधी बनू नका, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
दरम्यान, विरोधकांचा 1 नोव्हेंबर रोजीचा मोर्चा म्हणजे कव्हर फायरींग आहे. निवडणुका आहेत, त्यामुळे कव्हर फायरींग करत आहेत. निवडणुका जिंकू शकत नाहीत, त्यामुळे ही लोक हे करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.


















