सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणूक मित्रपक्षासोबत युती न करता काँग्रेसने स्वतंत्रपणे लढवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे काँग्रेसचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे यांनी खा. प्रणिती शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात रसाळे यांनी म्हटले आहे की, खा. प्रणिती शिंदे या फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात पक्षाच्या भूमिकेबद्दल स्पष्ट व निडरपणे मत मांडत आहोत. त्यामुळे आपल्याबद्दल जनमाणसामध्ये एक वेगळी प्रतिमा झालेली आहे. वेळोवेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मत मांडणारे संपूर्ण महाराष्ट्रात आपण एकमेव नेत्या आहात. आपल्या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ता ताठ मानेने राजकारणात फिरतो व त्याला जन माणसात पाठबळ मिळत आहे. त्यामुळे सोलापूरच्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आले. आपल्या नेतृत्वामुळे काँग्रेसचे उमेदवार निवडणूक येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
२०२५ च्या महानगरपालिकाच्या निवडणूक मित्रपक्षासोबत युती न करता स्वतंत्रपणे कॉग्रेस पक्षाने सोलापूर शहरात निवडणूक लढविल्यास सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, असे निवेदनात नमूद केले आहे.

















