पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड पाटीजवळ सोमवारी राञी एक वाजण्याच्या सुमारास मारुती कोंडींबा चव्हाण यांच्या घराचा दरवाजा तोडुन कपाटातील दोन तोळे वजनाचा मिनी गंठण किंमत 1,40,000 तसेच रोख रक्कम 10,000 रुपये यामध्ये 500,200 व 100 रुपयांच्या नोटा असा 1,50,000 रुपयांचा ऐवज व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली .
तसेच कोंडीबा चव्हाण यांच्या शेजारीच राहणारे जगदीश निवृत्ती गायकवाड यांच्या घरासमोर लावलेल्या दोन मोटारसायकली यामध्ये सि.बी शाईन mh 45 ak 2382 व सिडी डिलक्स mh 45 r3306 ह्या दोन मोटारसायकली सुद्धा चोरांनी लंपास केल्या आहेत. याठिकाणाहुन जवळच असणार्या लवटे फार्म हाऊस याठिकाणी सुद्धा चोरीचा चोरट्यांनी प्रयत्न केला माञ तो यशस्वी झाला नाही .
या घटनेची माहीती समजताच पिलीव पोलीस ठाण्याचे हवालदार स्वरूप शिंदे व हवालदार पंडित मिसाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर या घटनेचा पंचनामा केला.तसेच याठिकाणी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दिंडोरी यांनी घटनास्थळी भेट दिली .यासाठी सोलापूरहून श्वान पथक तसेच फाॅरनसीक टीमने सुद्धा घटनास्थळी येऊन पाहणी केली.या चोरीच्या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत .
पिलीव येथे गेल्या मंगळवारी पाच घरफोड्या झाल्या होत्या यामध्ये रोख रक्कम व ऐवजासह जवळपास तिन लाख विस हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरटयांनी लंपास केला होता .त्यानंतर आठवडाभराचया आतच पुन्हा चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन चोरीचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे .

















