सोलापूर – दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री पंढरपूर येथील श्रीविठू माऊलीच्या कार्तिकी यात्रेसाठी हजारो वारकरी भाविक विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात. भाविकांची आणि वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता,एसटी महामंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यांमधून पंढरपूर मार्गावर ५५० ज्यादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्तिकीची पंढरपूर यात्रा हि (दि.२९ ते दि.६ नोव्हेंबर २०२५) याकालावधीत संपन्न होणार आहे. या कालावधीत भाविक वारकऱ्यांना प्रवासामध्ये कोणतेही अडचण येऊ नये,यासाठी सदरच्या ज्यादा बसेस आजपासून पंढरपूर मार्गावर सोडण्यात येणार आहेत.
दरम्यान, यात्रेचा मुख्य दिवस कार्तिकी एकादशी रविवार (दि.०२) नोव्हेंबर रोजी आहे. तर पौर्णिमा बुधवार (दि.०५) रोजी आहे. त्यानुसार ज्यादा बसेस पंढरपूर मार्गावर विविध एसटी विभाग आणि आगारातून धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर विभागाचे ज्यादा एसटी बसेस नियोजनमध्ये सोलापूर – बार्शी, पंढरपूर- मंगळवेढा,पंढरपूर -अक्कलकोट पंढरपूर -शिखर शिंगणापूर या मार्गावर जादा बसेस सोडलेले आहेत.तसेच पंढरपूर -पुणे, पंढरपूर -मुंबई व इतर अन्य महत्त्वाच्या मार्गांवर बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे नियोजन देखील राज्य परिवहन महामंडळाने व विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
कार्तिकी यात्रेसाठी राज्यातील विविध एसटी विभागातील ज्यादा एसटी बसेस नियोजन
विभाग बसेस संख्या
सोलापूर १५०
कोल्हापूर १००
पुणे १००
सांगली १००
सातारा १००
एकूण ५५०
सोलापूर एसटी विभागाच्या १५० बसेची आगारनिहायसंख्या
आगार बसेस संख्या
सोलापूर २३
पंढरपूर १५
बार्शी ३०
अक्कलकोट १३
करमाळा १४
अकलूज १०
सांगोला १३
मंगळवेढा १४
एकूण १५०
कोट
यात्रा कालावधीत सर्व सवलत प्रवास योजना लागू
कार्तिकी यात्रा कालावधीत सर्व प्रवासी सवलती लागू राहतील, की जसे अमृत जेष्ठ नागरिक शंभर टक्के प्रवास भाड्यात सवलत, महिला सन्मान योजना ५० टक्के प्रवास भाड्यात सवलत ई.या सर्व सवलती चालू राहतील.त्यामुळे वारकरी प्रवाशांनी एसटीच्या सर्व सवलतींचा लाभ घ्यावा.
– अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक सोलापूर एसटी विभाग




















