सोलापूर : शहरात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये याकरिता श्री सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराज भक्तांतर्फे आज (गुरुवारी) सम्राट चौक येथील मंदिरात सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी दिली.
सोलापूर शहरात सध्या रक्ताच्या तीव्र तुटवड्याची स्थिती आहे. या संकटामुळे रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा होत नसल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याची जाणीव असलेल्या श्री सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराज भक्तांनी आज (गुरुवारी) एका अनन्यसाधारण रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे. हा महायज्ञ सम्राट चौकातील श्री सद् गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या मंदिरात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. यासाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य लाभणार आहे.
या पवित्र उपक्रमात सहभागी होताना प्रत्येक भक्ताने श्री महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी प्रदान केलेला गुरुमंत्र जपत रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी केले आहे. हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित नसून, श्री महाराजांच्या भक्तीमार्गातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे समाजसेवेचा व भक्तीचा संगम साधला जाईल. सोलापूरकरांनी या श्रेष्ठ रक्तदान महायज्ञात सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे यांच्याशी ८९९९७३९७८९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी केले आहे.


















