सोलापूर – नवोदित लेखक निलेश महामुनी लिखित “सिद्धरामेश्वर माझा विसावा” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार पेठेतील कालीका मंदिरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतीले तर प्रमुख अतिथी म्हणून गिरीश देवरमनी,चंद्रकांत वानकर,विनायक महिंद्रकर,चंद्रकांत वेदपाठक,वसंतराव महामुनी,शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण,महेश धाराशिवकर,निलेश धाराशिवकर,यांची प्रमुख उपस्थिती होती.
निलेश महामुनी यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या चौथ्या नंदीध्वजावर विसावा पुर्ण केला होता त्याप्रसंगाचे क्षण पुस्तकात शब्दबद्ध केले असुन हे पुस्तक प्रत्येकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतीले यांनी मांडले.
नवोदित लेखक निलेश महामुनी यांनी पुस्तक लिहिण्या मागचे उद्देश स्पष्ट करताना सांगितले की नंदीध्वज विसावा पुर्ण करताना आलेले अनुभव नंदीध्वज मास्तरांचे मार्गदर्शन कसे लाभले याबाबत सविस्तर सांगितले. विशेष म्हणजे कारागृहात राहुन त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे.
सदर प्रसंगी मानाच्या पाचव्या नंदीध्वजाचे मुख्य मास्तर शिवयोगी बनशेट्टी,सोमनाथ मेंडके, प्रसाद कुमठेकर,कुमार शिरसी यांच्यासह नंदीध्वजधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
	    	 
                                

















 
                