सोलापूर – शालेय मैदानी स्पर्धेमध्ये संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केली.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते , प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी, व्यवस्थापन समिती सदस्य पुष्पराज काडादी, प्राचार्य डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे यांनी अभिनंदन केले.
कामगिरी : ओंकार घोडके (तिहेरी व उंच उडी, सुवर्ण ), साद मुजावर (हातोडा फेक, रौप्य), अभिषेक पुजारी (४०० मीटर धावणे कांस्य), परशुराम वाघमारे ( ८०० मीटर धावणे रौप्य व पदक क्रॉस कंट्री पाचवा) , संस्कार शिंगाडे ( १५०० मीटर धावणे रौप्य व क्रॉस कंट्री चौथा), सिकंदर बिराजदार ( १५०० मीटर धावणे कांस्य) , तुषार वाघचौरे (५ किमी चालणे रौप्य), वैभवी धोत्रे (गोळाफेक, रौप्य), अनुष्का वाघमारे ४०० मीटर धावणे व अडथळा, कांस्य), भूमिका भडकुंबे (१५०० मीटर, कास्य).
४ बाय १०० व ४०० रिले रौप्य : मुले : विश्वराज भूसणगी, ओंकार घोडके, सिकंदर बिराजदार, परशुराम वाघमारे, अभिषेक पुजारी. मुली : आदिती पाटील, भूमिका भडकंबे, गायत्री गुडदिनी, प्राजक्ता पवार, अनुष्का वाघमारे.
 
	    	 
                                

















 
                