सोलापूर – शालेय शहर मैदानी स्पर्धेत मॉडेल पब्लिक स्कूलच्या हर्षराज पसफुलेने ४०० व ६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित दुहेरी मुकुट संपादला.
या कामगिरीवर त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यास क्रीडा शिक्षक रविकिरण आवटे व प्रशिक्षक सूर्याजी लिंगडे, भारती लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी अभिनंदन केले.
 
	    	 
                                
















 
                