सोलापूर – शालेय शहर बेसबॉल स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूल स्टेट बोर्ड संघाने १४ वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले. या संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
मल्लिकार्जून प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी इंडियन मॉडेल स्कूल सीबीएसई या संघास पराभूत केले. संघास क्रीडा शिक्षक अक्षय माने व राजकुमार माने यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका सुजाता बुट्टे व ममता बसवंती यांनी अभिनंदन केले.
विजयी संघ : अजिंक्य बिराजदार, आर्यन राजगुरु, अर्णव राजगुरु, वरद ओक, तन्मय कोळी, राजवर्धन घुले, मनिष दुम्मनवर, आरुष केंदुळे, सच्चिदानंद सुरवसे, आयुष जाधव, हर्षल माने, मयांक पांढरे, अर्णव माने, आदित्य शिवदे, अर्णव भंडारी, कृष्णा करजगी.


















