तभा वृत्तसेवा,
पंढरपूर – कार्तिकी शुध्द एकादशी २ नोव्हेंबर २०२५ रोजी असून, कार्तिकी यात्रा कालावधी दि.२२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर आहे. या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या वारी कालावधीमध्ये दिनांक ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्री करणे यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन उपविभागीय दंडाधिकारी श्री.इथापे यांनी ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्री करणे यावर घालण्यात आली आहे.


















