पंढरपूर – प्रारुप मतदार यादीतील दुबार नावे असलेल्या मतदारांनी त्यांना कोणत्या प्रभागात मतदान करावयाचे आहे, याबाबत लेखी अर्ज रहिवास पुराव्यासह दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पंढरपूर नगरपरिषद कार्यालयात सादर करावेत असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.
या संदर्भात माहिती देताना मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले की, पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सार्वत्रिक निवडणूक सन २०२५ करीता दि.८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार आणि प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने, तसेच निवडणुक आयोगाकडील प्राप्त संभाव्य यादी अन्वये प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे आणि काही नावे एकापेक्षा अधिक वेळा आली असल्याचे आढळुन आले आहे.
तरी प्रारुप मतदार यादीतील अशा दुबार नावांची यादी पंढरपूर नगर परिषदेच्या सूचना फलकावर तसेच https://mahaulb.in या संकेतस्थळावर दि. २८ ऑक्टोबर २०२५ पासुन उपलब्ध आहे. या यादीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांना कोणत्या प्रभागात मतदान करावयाचे आहे, याबाबत लेखी अर्ज रहिवास पुराव्यासह दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पंढरपूर नगरपरिषद कार्यालयात सादर करावेत, अशी सूचना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.


















