सोलापूर – उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री सुंदर शाळा’ योजनेचा तिसरा टप्पा तीन नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. लोकसहभाग, सांघिक प्रयत्नांसह, नावीन्यपूर्ण उपक्रमांची विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानाचा तिसरा टप्पा तीन नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे . यामध्ये विजेत्या शाळांना कोट्यवधींची बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना सहभागी होता येणार आहे.
‘मुख्यमंत्री सुंदर शाळा’ या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण ८६ कोटी ७३ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत विभागण्यात आले आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहे.
१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे. २०२५-२६ मध्ये हे स्पर्धात्मक अभियान नवीन उपक्रमांसह राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ही योजना सुधारित निकषांसह राबवली जाणार आहे आणि त्यासाठी ८६ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुधारीत निकष आणि उपक्रमासह हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाला दोन वर्षात राज्यात चांगला प्रतिसाद मिळाले आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे.सुधारित निकषांसह या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
यामध्ये १०० गुणांच्या आधारे शाळांचे मूल्यांकन केले जाणार असून विद्यार्थी-केंद्रित उपक्रम आणि स्वच्छतेसारख्या गोष्टींचा समावेश आहे .
…
…
या अभियानात निवडलेल्या शाळांना राज्य आणि जिल्हा स्तरावर रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. राज्य स्तरावर प्रथम क्रमांकासाठी २१ लाख रुपये आहे. विविध स्तरावर ८६ कोटी ७३ लाख रूपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे.
….
…,
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ ही महाराष्ट्र शासनाची एक स्पर्धात्मक योजना आहे. जी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेत अधिक सक्रिय करण्यासाठी राबवली जात आहे . या योजनेत शाळांची निवड विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, स्वच्छता आणि इतर निकषांवर आधारित केली जाणार आहे.


















