सोलापूर – शिवसेनेचे विभागीय नेते माजी मंत्री चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांच्या उपस्थित महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित बैठकीत शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी कार्याचा अहवाल सादर करताना आपल्याच पदाधिकाऱ्यांवर आणि शिवसैनिकांवर केलेले आरोप दुर्दैवी आहे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख जबाबदारी देऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे.
यावेळी दक्षिण सोलापूर दक्षिणमध्ये अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली. परंतु त्यांचे प्रचाराची यंत्रणादेखील जिल्हाप्रमुख या नात्याने केली नाही. शिंदेची बंडाळी टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. सोलापूर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बनावट बूथ यंत्रणा राबवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. घरामध्येच बसून फक्त सोशल मीडियावरती फोटो टाकून किंवा गप्पा मारतानाचे फोटो पोस्ट करत महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे , असे भासवून वरिष्ठांची दिशाभूल केली आहे.
काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत येऊन येथील निष्ठावंत शिवसैनिकांवर दंडेलशाही केली आहे. तसेच सर्व शिवसैनिकांना मी अखंड सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख आहे अशा अविर्भावात वावरत आहे.
  शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या त्रासाला कंटाळून शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी नगरसेवक भारत बडूरवाले, गुरूशांत धूत्तगावकर, ज्येष्ठ कामगार नेते विष्णू कारमपुरी यांनी शिवसेना सोडली. तसेच युवासेनेमध्ये देखील त्यांनी हस्तक्षेप केल्याने युवासेना पदाधिकारी त्यांच्या त्रासाला कंटाळून शिवसेना शिंदे गटात गेले. तसेच अनेक युवासेना पदाधिकारी अलिप्त आहेत. तसेच महिला आघाडीमध्ये हस्तक्षेप केल्याने अनेक महिला शिवसेनेपासून अलिप्त झाल्या आहेत. अशा गैरकारभार करणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांसा तात्काळ पक्षातून हकालपट्टी करून सामान्य शिवसैनिकाची  नियुक्ती करण्याची मागणी जिल्हा उपप्रमुख दत्ता वानकर, शहर संघटक लहु गायकवाड व सुरेश जगताप यांच्यासह अनैक शिवसैनिकांनी केली आहे.
…
भाजपाचे षडयंत्र
…
शिवसेना पक्ष वाढत असल्यामुळे भाजपाच्या नेत्यांना पक्षविस्तार बघवत नाही. म्हणून त्यांनी सेनेच्या नेत्यांमार्फत षडयंत्र सुरू केला आहे. माझ्याविरूध्द तक्रार करणार्यांना मी उत्तर देण्यास तयार आहे. विरोधकांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करावे. सेनाभवनात सोक्षमोक्ष होईल.
अजय दासरी, जिल्हाप्रमुख, उबाठा शिवसेना.
 
	    	 
                                



















 
                