सोलापूर – कार्तिक वारीसाठी उळे (ता.दक्षिण सोलापूर) येथील श्रीगुरू देहुकर सांप्रदायिक मंडळाच्या दिंडीचे बुधवारी सकाळी दहा वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज श्रीगुरू बापुसाहेब महाराज देहूकर व श्रीगुरू कान्होबा महाराज देहुकर यांच्या कृपाशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने हि दिंडी परंपरा सुरू आहे. येथील हनुमान मंदीरातून हभप दत्तात्रय महाराज क्षिरसागर यांच्या हस्ते वीणा पूजनाने दिंडीचे प्रस्थान झाले.
यावेळी हभप धनंजय महाराज गुंड, हभप. प्रभु लिंग महाराज क्षिरसागर , हभप दत्तात्रय महाराज घायाळ, विणेकरी गणपत खंडागळे, गुरुलिंग कुंभार, राहूल शिंदे, हरी खंडागळे, भैरु शिंदे, विष्णू शिंदे, चांगदेव घोरपडे, मृदंगाचार्य राम खंडागळे, आदिनाथ खंडागळे, सोमनाथ खंडागळे, श्रीकांत आरगे, मच्छिंद्र डांगे, दत्तात्रय खंडागळे आदींसह वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. हि दिंडी मोहोळ मार्गे पंढरपूरकडे जात आहे. दींडीत सुमारे शंभर वारकरी सहभागी झाले आहेत.
 
	    	 
                                



















 
                