टेंभुर्णी – बंद केलेला रस्ता खुला करण्यासाठी मातंग एकता आंदोलनचे रामभाऊ वाघमारे व शेतकरी संघटनेचे चंद्रकांत कुटे यांनी शेतकऱ्यांसह बुधवारी दि.२९ रोजी चालू केलेले आमरण उपोषण गुरुवार दि.३० रोजी भाड्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी शिष्टाई करीत शेतक-यांना पर्यायी रस्ता खुला करून दिल्याचे लेखी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
टेंभूर्णी कुर्डुवाडी रोडवरून गट नं. १०४२, १०४२/अ, १०४२/४३, १०४३,१०३५/३६०६, १०४१/४२ या गटात व इतर शेतकऱ्यांचा येण्या जाण्याचा शेकडो वर्षे जुन्या वहीवाटीच्या रस्ता सुमारे तीन वर्षापासून बंद केला आहे. शेतमाल काढून बाजारपेठेत विक्रीसाठी नेता न आल्याने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी सखाराम श्रीपती ननवरे व सी. लक्ष्मी पोपट ननवरे या दोन शेतक-यांचा धक्का बसून मृत्यू झाला आहे.तसेच या भागातील पशुधन व विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळेत जाणे येण्यासाठी गैरसोयीचे होत असल्याने बुधवार दि.२९ पासून शेतक-यांनी उपोषण चालू केले होते.त्याची दखल घेऊन तहसीलदार संजय भोसले यांनी परिसरातील शेतकरी गट नं. १०४२,१०४३,१०३५/३६ या जमिनी मध्ये जाणे येणे रस्त्यासाठी गट नं. १०३८ व १०४४ याचे बांधावरील नकाशातील रस्ता खुला करण्यासाठी दोन्ही गटाचे जमीन धारक बळीराम गोसावी व सतीश होटकर यांचेशी चर्चा करून बांधारील रस्ता सहमतीने अतिक्रमण काढून नुकसान भरपाई देऊन तोडगा क रस्ता सुरु करणेस मान्यता दिलेली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील चांदजकर,प्रा.सुहास पाटील, पंचायत समिती सदस्य वैभव कुटे, रामभाऊ शिंदे, वडार पॅंथरचे राजकुमार धोत्रे, बहुजन मुक्ती पार्टीचे महेंद्र सोनवणे, मंडल अधिकारी गंगासागर सोनवणे,अनिल गवळी, बाळासाहेब बागाव, सचिन लोंढे-पाटील, सुरेश कुटे,शरपुद्दीन मुद्राची, योगेश दाखले, सतीश जगताप, अनिल जगताप,रूपेश वाघमारे, विशाल जगताप,यांनीही शेतकऱ्यांचे समेट घडविण्यासाठी प्रयत्न केला.
यावेळी मातंग एकता आंदोलन चे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे,स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे चंद्रकांत कुटे, पोपट ननवरे,अजिनाथ कुटे, समाधान ननवरे, संतोष ननवरे, सुभाष ननवरे,संजय माळी,बळी ढगे हे शेत क-यांनी उपोषण तहसीलदार संजय भोसले यांचे हस्ते ज्युस पिऊन स्थगित करण्यात आले.
 
	    	 
                                



















 
                