सोलापूर – महापालिका प्रभाग क्रमांक २२ येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सन २०२३- २४ अंतर्गत माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून ११ लाख २८,५८८ खर्चित सोनीनगर, मोदी हुडको, येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक २२ च्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात प्रयत्न करण्याची ग्वाही किसन जाधव यांनी दिली.यावेळी हरीश तेलगू ,सिद्राम वाडेकर, आमिर तांबोळी, फैयाज शेख, धनंजय नगरकर, जनार्दन कांबळे, गणेश दुगाने, मधुकर कश्यप, वसंत गोरे, नीलम गोरे, अनिता भंडारे आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
 
	    	 
                                



















 
                