वेळापूर – वेळापूर व तांबवे परिसरातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी तात्काळ निधी मंजूर करावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षा तर्फे निवेदन तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले.
वेळापूर येथील सर्व सुविधा असलेले एस.टी. बसस्थानक मंजूर करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे ट्रॉमा केअर सेंटर किंवा ग्रामीण रुग्णालयात रूपांतर, फुले शाहू आंबेडकर नगर येथे तक्षशिला बुद्ध विहारासमोर सभा मंडप बांधकाम, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व व्यायामशाळा उपलब्ध करणे, तसेच तांबवे परिसरातील पायरीपूल ते तांबवे रस्ता दुरुस्ती या मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी माजी आ.राम सातपुते सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, पश्चिम महाराष्ट्र संघटक एस. एम. गायकवाड, तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर, युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे विनोद रणदिवे,रोहित सोरटे आदी उपस्थित होते.
निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिले.
 
	    	 
                                



















 
                