(टोयोटा किर्लोस्कर मोटर) ने डिसेंबर २०२२ मध्ये आपली बहुप्रतीक्षित मल्टी पर्पस व्हीकल (एमपीवी) Toyota Innova Hycross MPV (टोयोटा इनोवा हाइक्रॉस एमपीवी) ला भारतीय बाजारात लाँच केले होते. ही एक सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉन्ग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हीकल (एसएचईव्ही) आहे. आता टोयोटाने याची डिलिव्हरी सुरू केली आहे. जर तुम्ही या इनोव्हाच्या एमपीव्हीला खरेदी करण्याची योजना करीत असाल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कारचा वेटिंग पीरियड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स संबंधी माहिती देत आहोत.
नवीन इनोव्हा हायक्रॉस ३ वर्ष किंवा १००००० किमीपर्यंत वॉरंट आणि ५ वर्ष किंवा २२०००० किमीपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटी, ३ वर्षापर्यंत फ्री रोडसाइड असिस्टेंट, आकर्षक फायनान्स स्कीम आणि हायब्रिड बॅटरीवर ८ वर्ष तसेच १६०००० किमी पर्यंत वॉरंटी सोबत टोयोटा एक्सपीरियन्स देते.
Toyota Innova HyCross ची किंमत १८.३० लाख रुपये पासून सुरू होवून २८.९७ लाख रुपये पर्यंत जाते. सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. भारतात इनोव्हा हायक्रॉसला एकूण ५ व्हेरियंट्स मध्ये G, GX, VX, ZX आणि ZX (O) आणले आहे. सेल्फ-चार्जिंग हाइब्रिड व्हर्जन तीन व्हेरिएंट्स – ZX(O), ZX आणि VX मध्ये उपलब्ध आहे. VX व्हेरियंट ७ सीटर आणि ८ सीटर मध्ये येते. तर पेट्रोल व्हर्जन दोन ट्रिम्स G आणि GX मध्ये उपलब्ध आहे. ज्यात दोन व्हर्जन मध्ये ७ सीटर आणि ८ सीटर ऑप्शन आहे.