अक्कलकोट : मुंबई घाटकोपर पश्चिम येथील हॉटेल अजिता येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आराध्य लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सन २०२५ च्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या कबड्डी स्पर्धेत कु. सेरेना म्हसकर ने भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण पदक पटकविल्याबद्दल सत्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी आमदार पराग शहा घाटकोपर पूर्व हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुंबई चुनाभट्टीचे माजी नगरसेवक विजय तांडेल, हॉटेल अजितचे संचालक धर्मेश गिरी, माजी नगरसेविका तन्वी विजय तांडेल, आराध्य विजय तांडेल, आरतीताई लिंगायत, अक्कलकोट चे सामाजिक कार्यकर्ते शिवराज स्वामी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप सिद्धे, अन्नछत्र मंडळाचे खजिनदार संजय उर्फ लाला राठोड, महाराष्ट्र पालखी परिक्रमा मुख्य संयोजक व विश्वस्त संतोष भोसले, मुस्लिम समाजाचे मैनुद्दीन कोरबु, सरफराज शेख, संतोष माने, रमेश हळसंगी, असद फुलारी, बाबुभाई मनुरे, उद्योगपती विक्रांत पिसे, योगीराज सिद्धे, प्रशांत शिंदे साठे, कुणाल भालेकर यांच्यासह घाटकोपर पूर्व-पश्चिम भागातील लोकप्रिय प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

























