बार्शी – सुवर्णलता गांधी महाविद्यालय, वैराग येथे आज सोमवार दि. ३ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी “स्पर्धा परीक्षेची तयारी व व्यक्तिमत्व विकास” साठी प्रा. डॉ. रविराज फुरडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शकील शेख, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. व्ही.एम. कदम उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पुढे सर बोलत होते. दैनंदिन जीवनात यशाला शॉर्टकट नाही. नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण अभ्यास हाच पर्याय आहे. आपण निवडलेले क्षेत्र, त्यासाठी लागणारे विविध संदर्भ, प्रश्नपत्रिकांची तयारी तसेच यशस्वी स्पर्धकांच्या मुलाखतींचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुलाखतीची तयारी व्यक्तिमत्त्वातील टापटीप इत्यादी बाबीही महत्वपूर्ण आहेत.
अपयशाने खचून न जाता अपयश हीच खरी यशाची सुरुवात पाहून धैर्याने सामोरे जायला हवे. त्यासाठी “नित्य नवे वाचन हवे” हा मूलमंत्र ही दिला. दैनंदिन जीवनातील प्रेरणा प्रेरक उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. आयोजकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व समन्वयक डॉ. व्ही.एम. कदम सरांनी प्रयत्न केले. कदम सर यांनीच आभार मानले.


























