नांदेड – हदगाव शहरातील जाज्वल तथा पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी येथील प्रसिद्ध मंदिरात ४१ किलो चांदीच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दि.५ नोव्हेंबर रोजी श्री दत्त भगवान चे निस्सीम भक्त तथा अपार श्रद्धा असलेले श्री सुभाष शुगर हडसनी, शिऊर साखर कारखाना लि. वाकोडी या दोन्ही कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख व कार्यकारी संचालक सुशील कुमार सुभाषराव देशमुख यांच्या वतीने महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते ज्यात शिरा, पुरी, मसाला भात, भाजी याचा समावेश असून याचा हदगाव नगरीसह पंचक्रोशीतील हजारो दत्त भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
हदगाव शहरालगत दत्तबर्डीच्या टेकडीवर श्री दत्तात्रय चे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. दत्तात्रयांचे हे मोठे घर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात अनेक वर्षांपूर्वी बनवलेली मूर्ती आहे या मूर्तीला बदलण्याची गरज असल्याचे सर्व भक्तगणांच्या आणि खुद्द श्री श्री १००८ महंत श्री गोपाळगिरी महाराजांच्या लक्षात आले त्यांनी सर्व दत्त भक्तांची बैठक घेत ४१ किलो चांदीची मूर्ती बसवण्याचा संकल्प केला असून त्यास सर्व दत्त भक्तांनी सढळ हाताने देणगी दिली तर श्री दत्त भगवानचे निस्सीम भक्त श्री सुभाष शुगर व शिऊर साखर कारखाना याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख व कार्यकारी संचालक सुशील कुमार देशमुख यांनी ही मूर्तीसाठी मोलाचा हातभार तर लावलाच पण प्राणप्रतिष्ठानंतर महापंगतीचे देखील आयोजन केले असून याचा लाभ हजारो दत्त भक्तांनी घेतला.




















