बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (Border Security Force, BSF) ज्युनिअर एक्स रे असिस्टंटसह अनेक पदांची भरती केली आहे. या भरतीद्वारे एक्स रे असिस्टंट, स्टाफ नर्स, कॉन्स्टेबल आणि इतरांची एकूण ६४ पदे भरली जाणार आहेत. या पदांवर भरतीसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयात समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि भरती अधिसूचना वाचा.