सोलापूर – गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळ आणि अवनी डेव्हलपर्स अॅंड कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीपावली कार्तिक एकादशीनिमित्त भव्य दीपोत्सव आणि वेणूज् संगीत संध्या या कार्यक्रमाने तेथील परिसर भक्तीत तल्लीन झाले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अवनी डेव्हलपर्सचे संचालक लक्ष्मण सिध्दूल, चार्टर्ड अकौटंट चंद्रकांत इंजामुरी आणि अरिहंत स्कूलचे संस्थापक डॉ. अजय पोन्नम, यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या संगीत संध्या कार्यक्रम तल्लीन होऊन मनमोकळेपणाने नृत्य करीत आनंद लुटला. या कार्यक्रमाने परिसरातील वातावरण अगदी भक्तीमय झाला.यामुळे आनंद, भक्तीभाव आणि ऐक्याची भावना अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती डॉ सुर्यप्रकाश कोठे, विभागीय खाण खनिज अधिकारी भानुचंद्र कोलप्याक, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, वासू यलदंडी, नरेश कोलप्याक, दिपक दोंता, अमर गुर्रम, निशांत पोरे, सौ.दिपीका यलदंडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी वेणूज् आर्केस्टाचे वेणुगोपाल उत्तूर, महेश चव्हाण, रविंद्र तुम्मनपल्ली, नरेश आरसिद, सौ. अनुराधा गंगुल, सौ. वर्षा सोनवले यांनी तेलुगु, मराठी, कन्नड आणि हिंदी गाण्याने कार्यक्रमाची मैफील रंगवली. यावेळी रसिकांच्या वन्स मोअर प्रतिसादाने गायकांचीही प्रशंसा झाली. यावेळी रसिकांना आणि विडी घरकुल परिसरातील नागरिकांना मनसोक्त आनंद घेता आला. यावेळी अवनी डेव्हलपर्सचे संचालक लक्ष्मण सिध्दूल आणि हिरालाल माकम यांनीही आपल्यातील कला यावेळी सादर करून वाह ..वाह.. मिळवली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले























