सोलापूर – स्पोर्ट्स ऑफ इंडिया तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया या स्पर्धेत राष्ट्रीय धावपटू साईश्वर केशव गुंटूक याने उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला असून 16 वर्षेखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेत साईश्वरने 10k अंतर स्पर्धेत कमी वेळेत 35 मिनिटे 09 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करून सर्वांना अचंबित केले आहे. ही स्पर्धा राजस्थान येथे स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. साईश्वरला नॅशनल स्पोर्ट्स क्लब तर्फे ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. साईश्वर गेल्या 8 ते 9 वर्षापासून लांब पल्ल्याचे धावण्याचे सराव करत आहे.
साईश्वर व श्रद्धा यांना 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. सोलापुरात सिंथेटीक ट्रॅक नसल्याने आठवड्यातून दोन दिवस विजयपुरा व कलबुर्गी येथील सिंथेटीक ट्रॅकवर सराव करण्यासाठी जात असतात.
साईश्वरला सिनियर ऑलिंपियन केशवराज सिंह यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे , प्राचार्य चिदानंद माळी , क्रिडा प्रशिक्षक कृष्णा कोळी तसेच सर्व शिक्षकांचे व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Post Views: 21