मंगळवेढा – मंगळवेढा – पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे भाजपचे आमदार असल्यामुळे मंगळवेढा नगरपालिकेचा नगराध्यक्ष सुध्दा भाजपचाच असणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट, अनगर, दुधनी, मोहोळ, मैंदर्गी या नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार निश्चित नंतर त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यावर देण्यात आली.
सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सर्वच पक्षाकडे राजकीय उठबस कायम राहावी या दृष्टिकोनातून अनेकांनी आघाडीवर निवडणुका लढवण्याचा पर्याय शोधून ठेवला होता मात्र सगळ्यात अगोदर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पक्ष वाढीसाठी त्यांच्या निवडीनंतर नेटाने काम सुरू केले.
जिल्ह्यात पक्ष वाढवण्याची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी ,आ. देवेंद्र कोठे, आ. सुभाष देशमुख,आ. विजयकुमार देशमुख, आ. समाधान आवताडे यांच्याबरोबर शशिकांत चव्हाण यांनी घेतले असून
सध्या जिल्ह्यात अनेकांना भारतीय जनता पार्टी प्रवेश करून भाजप मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा परिस्थितीत येणाऱ्या निवडणुका पक्ष चिन्हावर लढवण्याच्या दृष्टीने त्यांनी आपली भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे त्यामुळे सध्या एबी फार्म देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आल्यामुळे सध्या जिल्ह्यात उमेदवार निवडी बरोबर निवडून येण्याची शाश्वती असणाऱ्यांना पक्षाची उमेदवारी दिली जाणार आहे.
त्यामुळे सध्या जिल्हाध्यक्ष चव्हाण यांची भूमिका यामध्ये निर्णायक ठरणार आहे आज त्या संदर्भातील एबी फॉर्म भाजप प्रदेश करण्याचे समन्वयक सुधीरजी देऊळगावकर,महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आ.विक्रम पाटील तसेच प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.





















