सोलापूर – शीख समाजाचे संस्थापक, श्रद्धास्थान पूज्य श्री गुरुनानक देवजी यांचा 556 वी जयंती निमित्ताने, अंत्रोळीकर नगर, सोलापूर येथील गुरुद्वारा येथे विश्व हिंदू परिषद समरसता आयाम तर्फे आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी विश्व हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री संजय जमादार, विभाग सह मंत्री विजयकुमार पिसे, धर्माचार्य संपर्क प्रांत सह प्रमुख नागनाथ अण्णा बोंगरगे, बजरंग दल सह संयोजक अभय कुलथे , जिल्हा विशेष संपर्क प्रमुख प्रवीण जिल्ला , जिल्हा प्रमुख समरसता आयाम चंद्रकांत कुलकर्णी यासह पंढरपूर येथील समरसता प्रांत टोळी सदस्य रविंद्र साळे, मातृशक्ति प्रांत टोळी सदस्य मालतीताई गंभीर, दुर्गावाहिनी विभाग संयोजिका प्रगती नाकुरे, जिल्हा सह मंत्री गोपाळ सुरवसे, सेवा विभाग जिल्हा प्रमुख संभाजी राव मडके, मंगळवेढा प्रखंड पालक दत्तात्रय ताम्हणकर, दुर्गावहिणी अकलूज प्रखंड संयोजिका वैष्णवी वाघमारे तसेच मातृशक्तीचे राणी अद्लिंग आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शीख समाजाचे ज्येष्ठ प्रमुख रमेश सिंहजी, प्रदीप सिंहजी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना धार्मिक पुस्तक देवून आशीर्वाद दिले. सर्वांनी लंगर मधील प्रसाद ग्रहण करून श्री गुरुनानक देव जी चे आशीर्वाद घेतले.






















