मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण रंगत असतानाच रविवारी त्याला आणखी एक किनार लाभली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रेतील मातोश्री निवासस्थानावर अचानकपणे एका ड्रोनने घिरट्या घालत असल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे कुटूंबियाच्या सुरक्षेच्या मुद्दा उपस्थित करीत त्यांच्या गटाच्या व मनसेच्या नेत्याकडून त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या तर एमएमआरडीएने पॉडकॉस्ट टॅक्सी सेवेसाठी पोलिसांच्या परवानगीने सर्व्हे करण्यात आला असल्याचा खुलासा करण्यात.
आदित्य ठाकरे यांनी त्याबाबत पाच प्रश्न उपस्थित करून सर्व्हे बाबत संशय व्यक्त केला आहे.
मातोश्री वर नेहमी उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था तैनात असते. उद्धव यांना झेड प्लस तर आदित्य यांना झेड दर्जाची आणि रश्मी ठाकरे यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे आज मातोश्री भोवती ड्रोन घिरट्या घालू लागल्याने एकच खळबळ उडाली. संभाव्य घुसखोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. यानिमित्ताने ठाकरे गटाचे आ.अनिल परब यांनी अनेक गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये अनिल परब म्हणाले की, “पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी. ड्रोन ऑपरेटरची ओळख आणि ड्रोन व्हिडिओमागचा हेतू शोधून काढावा.” त्यामागे काही दहशतवादी पार्श्वभूमी आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आले? यामागे कोणतीही दहशतवादी पार्श्वभूमी कारण तर नाही ना? ‘मातोश्री’सारख्या Z+ सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असा आरोप परब यांनी केला. एम एम आर डी ने त्याबाबत पत्र काढून खुलासा केलाय की बीकेसी ते वांद्रे परिसरात पॉडकास्ट टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी सर्वेचे काम सुरू असल्याने ड्रोनद्वारे पाहणी करण्यात येत आहे त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली होती.
———-==
आदित्य ठाकरे यांचे ‘एमएमआरडीए’ला प्रश्न
आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या खुलाशा बाबत आक्षेप नोंदविला आहे. त्याबाबत ट्विट करून प्रश्नाची सरबत्ती केली आहे. कोणत्या सर्वेक्षणामुळं तुम्ही घरांमध्ये डोकावून पाहता आणि दिसल्यावर लगेच बाहेर पडता?
रहिवाशांना माहिती का देण्यात आली नाही?
एमएमआरडीए फक्त आमच्या घराची देखरेख करत आहे का?
एमएमआरडीएने जमिनीवर जाऊन कामाच्या दर्जावर लक्ष केंद्रित करावे, जसे की एमटीएचएल (अटल सेतू) जे त्यांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे.जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना माहिती का देण्यात आली नाही?असे सवाल उपस्थित केले आहेत.




















