सोलापूर : एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर येथील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी “CSE Solar Sunpark Maharashtra Pvt. Ltd., माळूंब्रा” या सौर ऊर्जा प्रकल्पास शैक्षणिक औद्योगिक भेट दिली.
या भेटीचे आयोजन कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा. आर. पी. लांडगे आणि प्रा. ए. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. भेटीदरम्यान प्रा. एम. के. पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि अनुशासन राखण्याची जबाबदारी पार पाडली.
साइटवर उपस्थित साइट इंजिनिअर राजेश कडगावकर, मॅनेजर आकाश जाधव आणि साइट इंजिनिअर विश्वनाथ कुंभार यांनी विद्यार्थ्यांना सौर ऊर्जा निर्मिती प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. सौर पॅनेल्सची रचना, कार्यप्रणाली, देखभाल तसेच उत्पादन नियंत्रणाची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आली.
या भेटीच्या आयोजनात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आकाश जाधव (मॅनेजर) आणि अभिषेक मगर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना सौर ऊर्जा क्षेत्रातील प्रायोगिक ज्ञान व तांत्रिक अनुभव मिळाला.
या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना सौर ऊर्जा निर्मिती आणि व्यवस्थापनातील तांत्रिक बाबींची सखोल माहिती मिळाली. ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.



















