अक्कलकोट – नान्नज तालुका उत्तर सोलापूर येथील ग्रामदैवत माहुरची आई देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या तालुक्यातील अमोलराजे ग्रुप मध्ये सराव करणाऱ्या कुस्तीगीरीतील मल्ल पै. यश कुलकर्णी याने मध्यप्रदेशातील पैलवानास सालतु डावावर आसमान दाखवले, तर बडेसाब पठाण याने बांगडी डावावर केगाव उत्तर सोलापूर येथील पैलवानास दाखवले व पै. व्यंकटेश कुलकर्णी याने पै. महादेव चौगुले कोरोली यांच्या तालमीतील पैलवानास टांग डावावर चितपट करून विजय संपादन केले आहेत. अमोलराजे ग्रुपच्या पैलवानांची घोडदौड सुरूच असून, विजयाचा पताका फडकवीत आहेत.
दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सदर कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर कुस्ती स्पर्धा ह्या जी.बी. घोडके विद्यालयातील मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संघाच्या वतीने कुस्तीचे मोठे मैदान भरविण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री सहायता निधी महाराष्ट्र यांचे प्रशासकीय सल्लागार दत्तात्रय विभूते, भरत मेकाले, प्रल्हाद काशीद, भारत गवळी, वसंतराव साखरे, गटविकास अधिकारी समाधान नागणे, प्रणव ढेकणे श्री क्षेत्र अक्कलकोटचे पै. महेश कुलकर्णी, सर्फराज शेख, प्रशांत शिंदे-साठे, रमेश हळसंगी, असद फुलारी नान्नजचे संभाजीराव देडे, ग्रामविकास अधिकारी बापू हक्के, संजय मुळे, विश्वजित गवळी, श्रीकांत मुळे, महेश शिंगाडे, प्रवीण विभूते, दिपक अंधारे, प्रतापराव टेकाळे, तात्यासाहेब कादे, विनोद माने, शिवाजी गवळी, अशोक गवळी, मंजूर शेख, प्रज्वल गवळी, संतोष कोरे, महादेव गवळी, यांच्या सह नान्नज मधील छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संघातील वस्ताद मंडळी व पैलवान, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील, सोलापूर शहरासह, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांची परंपरा जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी जपली-
कुस्ती मैदानासाठी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी रुपये ११ हजार, नान्नज येथील कुस्ती मैदानासाठी तर पहिला क्रमांक पटकवीणाऱ्यास रुपये ५ हजार आणि दुसऱ्या क्रमाकांच्या मल्लासही रुपये ३ हजारची बक्षीस दिले. कुस्ती खेळणाऱ्यासाठी प्रोत्साहन देण्याकामी भोसले पिता-पुत्राकडून नेहमीच सहकार्य असते, गेल्या १५ महिन्यापासून तालुक्यातील ९० कुस्तीगीरांना दरमहा प्रसादरूपी खुराक दिला जात आहे. राज्यातीलच असे कार्य करणारे अन्नछत्र न्यास हे पहिले ठरले असून, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांची परंपरा जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अमोलराजे जनमेजयराजे भोसले हे जपत आहेत.
अमोलराजे ग्रुपचे दैदिप्यमान यशाची परंपरा कायम
बोरामणी येथे देखील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्तीस्पर्धेमध्ये अमोलराजे पैलवान ग्रुप अक्कलकोटचे पै. व्यंकटेश कुलकर्णी आणि पै. दत्ता खरात बादोले यांनी प्रेक्षणीय कुस्ती करून अमोलराजे पैलवान ग्रुपचे नांव दैदिप्यमान केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे.




















