सोलापूर – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , खासदार प्रणिती शिंदे, जिल्ह्याचे प्रभारी मोहन जोशी , सहप्रभारी के. संदीप यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुका निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठकीमध्ये टिळक भवन मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे सर्व नगरपालिका व नगरपंचायत इच्छुकांच्या मुलाखती संदर्भात माहिती जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिली. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी विधान परिषद सदस्य रामहरी रुपनर , आमदार अमित देशमुख, नशीब खान, विश्वजीत कदम, माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याच्या सर्व नगरपालिका व नगरपालिका इच्छुक उमेदवारांच्या बाबतीत जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी माहिती दिली . ज्या ठिकाणी आघाडी आहे, त्या ठिकाणी आघाडीने लढायचे आणि काही ठिकाणी स्वबळाने लढायचे असे आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिले. खासदार प्रणितीताइ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व निवडणुका पार पाडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शटगार यांनी सांगितले.



















