बार्शी – येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे आज शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती व बालदिन साजरा करण्यात आला. प्रथमतः पंडित जवाहरलाल नेहरु यांचे प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ संचालक धिरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाचनालयाने यावर्षी बाल वाचकांसाठी एक वर्षासाठी मोफत वाचक नोंदणी सुरु केली आहे. आमच्या वाचनालयात बाल विभाग स्वतंत्र आहे. तसेच बाल विभागात बाल विभागाची साधारण ५ हजार बाल साहित्ये व मासिके आहे. याचा बार्शीतील बालवाचकाने व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले. वाचक वर्ग व सभासद उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन किशोर श्रीश्रीमाळ यांनी तर आभार प्रदर्शन धिरज कुंकूलोळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा.ग्रंथपाल सौ. शितल लुकडे, क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.


















