सोलापुर- जिल्हा रोल बॉल असोसिएशन यांच्या वतीने इंदिरा प्रशाला येथे घेण्यात आलेल्या चाचणी स्पर्धेत एस. व्ही. सी .एस. हायस्कूल एमआयडीसी येथील विद्यार्थिनी श्रुती कांबळे हिने उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे तिची जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूला क्रीडा शिक्षक हणमंत यळमेली, आकाश बिराजदार व कालिका बोकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे, उपमुख्याध्यापक धनंजय नकाते व पर्यवेक्षक संतोषकुमार तारके यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या.


















