सोलापूर- फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळा सोलापूर या शाळेत भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक मो. इक्बाल बागबान होते तर अध्यक्षस्थानी डॉ. जन्नत बागबान व प्रमुख उपस्थिती म्हणून हाजी बशीर अहमद बागबान उपस्थित होते तसेच आज संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जन्नत बागबान यांचाही वाढदिवस होता म्हणून सर्व शिक्षकांतर्फे त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. जन्नत बागबान यांनी विद्यार्थ्यांना बालदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व शिक्षकांना आपल्या शाळेत चांगल्या शिक्षणाबरोबर ऐतेहासिक थोर व्यक्तींचेही माहिती विद्यार्थ्यांना सांगावे असे आवाहन केले व चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी शाळेच्यावतीने बालदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी समूह गीत, वक्तृत्व स्पर्धा व गांधी परिवारातील सर्व सदस्यांचे पोषख परिधान करून गांधी परिवाराची ओळख विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागबान नाहिद सुल्ताना व चौधरी यास्मीन या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाफिया शेख व आभार खतिब उम्मे हबीबा यांनी मानले.


















