सोलापूर – सन्मति ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, श्री न. फु.शहा कोठारी प्रशालेत शेती, व्यापार,उद्योग व पर्यावरण संरक्षण याविषयी व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक.श्री रमेश यादवाड सर व प्रमुख व्याख्याते तज्ञ मार्गदर्शिका सौ सुवर्णा जाधव मॅडम उपस्थित होते.
प्रारंभी प्रशालेतील सहशिक्षक श्री भांजे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिले.मान्यवरांचे स्वागत सत्कार मुख्याध्यापक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉक्टर सुवर्णा जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक जीवनात सेंद्रिय शेती,ठिबक सिंचन, बदलते हवामान, हवामानानुसार येणारी पालेभाज्या, इ चे महत्व सांगितले. पर्यावरण पूरक व्यापार व उद्योगाची विदयार्थ्यांनी उभारणी केली पाहिजे असे आवाहन केले.
शेती, व्यापार व पर्यावरण यावर कृतियुक्त स्पर्धा घेऊन सहभागी विध्यार्थ्यांना बक्षिसे देऊन कौतुक केले.या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी इ. उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. बिडवे एस. ए. यांनी केले तर आभार माने ए. एस. यांनी मानले.


















