सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी सोलापूर मनपा परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे यांची निवड करण्यात आली.पक्षाचे सोलापूर शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश कोषाध्यक्ष तथा सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते मुस्तारे यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांची निश्चिती करण्यात येऊन महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा मानस मुस्तारे यांनी यावेळी बोलून दाखवला.
यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल मुस्तारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


















