सोयगाव / संभाजीनगर – शासन निर्णयानुसार गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड,सोयगाव गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे,सोयगाव केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव-पूर्वीची जुनी कन्या शाळा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला.
गावकऱ्यांचा व माजी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अभूतपूर्व होता. अनेकांनी शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत सी.सी.टि.व्ही.कॅमेरे,शैक्षणिक साहित्य व विविध उपयुक्त वस्तूंची भेट दिली यामध्ये सोयगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राजेश भैय्या गिरी यानी शाळेला संगणक तर रविंद्र काळे,अनिल मानकर,विष्णू मापारी यानी शाळेला सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यासाठी आर्थिक मदत दिली.शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रविण्य मिळविणार्या विद्यार्थ्याना कृषीभुषण शेतकरी अरूण सोहनी यानी प्रोत्साहन बक्षिस जाहीर केले,तिरुपती पतसंस्थेकडून ही आर्थिक मदत देण्यात आली तसेच प्रमोद रावणे यानी दहा डसबिन व गणेश आगे यांनी एक मोठा डसबिन भेट दिला तर भास्कर चौधरी यानी १९९६ च्या बॅच कडून शाळेला आवश्यक असणारी भेट वस्तू जाहीर केली.
- शासन निर्णयानुसार माजी विद्यार्थी संघाची स्थापना
शासन निर्णयाच्या अनुषंगाने माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.हा निर्णय वाचून उपस्थितांना समजावून देणे व मार्गदर्शन करणे ही महत्त्वाची जबाबदारी मंगला बोरसे, केंद्रीय मुख्याध्यापक किरण पाटील,रामचंद्र महाकाळ या तिघांनी संयुक्तरीत्या पार पाडला.
यावेळी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड,केंद्र प्रमुख फिरोज तडवी, सोयगाव वकील तालुका संघाचे अध्यक्ष ॲड.राजेश भैय्या गिरी,प्रा.अनिल मानकर,ॲड योगेश पाटील,बाळू बोरसे,रवींद्र काळे मंगेश सोहनी,राजेंद्र काळे,नगरसेवक राजेंद्र दुतोडे,नगरसेवक हर्षल (बंटी)काळे,रवींद्र साखळे,अण्णा वाघ,रवींद्र काटोले,कृषीभूषण शेतकरी अरुण सोहनी,विजय कदम, बाबु शहा,दिलीप चौधरी,राजु कुडके,भास्कर चौधरी, भास्कर कोरडे,विवेक महाजन,अंकुश पगारे,रामेश्वर शिरसाठ,सोयगाव पोलीस स्टेशनचे सादिक तडवी,रामेश्वर शिरसाठ तसेच मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी याची उपस्थिती होती.
माजी विद्यार्थी संघाची नव्याने निवड
अध्यक्ष-रवींद्र पंडित काळे,उपाध्यक्ष-मंगेश सोहनी
कार्याध्यक्ष-अनिल मानकर,सहकार्याध्यक्ष-बाबु शहा तुराब शहा तसेच ज्येष्ठ सदस्य-ॲड राजेश गिरी,ॲड योगेश पाटील,कृषीभूषण अरुण सोहनी,समाजसेवक बाळू बोरसे, रवींद्र काटोले,अंकुश पगारे,विजय कदम,भास्कर कोरडे, दिलीप चौधरी, योगेश नागपुरे,राजू कुडके,
यावेळी मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,सुरेखा चौधरी,रामचंद्र महाकाळ,मंगला बोरसे,सविता पाटील,गणेश बाविस्कर, प्रतिभा कोळी,अंकुश काळे,विकार शेख,बी.वाय.बागवान, देसले सर आदी शिक्षकवृंद कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य-जुनी कन्या शाळेपासून आजच्या केंद्रीय प्राथमिक शाळेपर्यंतचा प्रवास या कार्यक्रमातून भावपूर्णपणे स्पष्ट झाला.माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेच्या विकासाला नवी ऊर्जा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
शासन निर्णय तसेच अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार केंद्रीय मुख्याध्यापक किरण पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रम सुयोजित,शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे राबविला. त्यांच्या शांत नेतृत्वशैलीमुळे कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.


















