पूर्णा / परभणी – पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकसाठी शनिवार रोजी नगरसेवक पदासाठी ३६ तर अध्यक्षपदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज पर्यंत अध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी सांगितले.
पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया दिनांक १० नोव्हेंबर सोमवारपासून पूर्णा तहसील कार्यालयात सुरू आहे शनिवारी नगरसेवक पदासाठी ३६ उमेदवारी अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिले असून रविवारी सुद्धा उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती निर्वाचन अधिकारी बोथीकर यांनी सांगितली.
येणाऱ्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे राहिलेल्या दोन दिवसात ऑफलाइन पद्धतीने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. शनिवार पर्यंत अध्यक्षपदासाठी मुख्य राजकीय पक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

















