हदगाव / नांदेड – शहरातील पंचशील माध्य व उच्च माध्य विद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापक गोपाळ बंड्रेवार,पर्यवेक्षक अनिल दस्तूरकर परीक्षा प्रमुख अरविंद जाधव सह सर्व शिक्षकांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर आदिवासी नृत्याचे सादरीकरण केले.निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा व भाषणात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सांस्कृतिक विभाग प्रमुख जनार्दन देशमुख यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली.
शाळेचे मुख्याध्यापक गोपाळरेड्डी बंड्रेवार हे किनवट तालुक्यातील असल्याने त्यांनी आदिवासी भाषाशैलीत श्रावण बाळ तसेच रामायणा तिल प्रसंग सांगून त्याचा मराठीत अर्थ सांगितला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्शना सोनटक्के, पुजा जंगवाड यांनी परिश्रम घेतले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यचा आढावा घेत कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीमती सारीका बारसे यांनी केले.


















