मंगळवेढा – मंगळवेढा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी नगरसेवक पदासाठी 24 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून सोमवार दि.17 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज आलेले पुढीलप्रमाणे-प्रभाग क्र.1 सय्यद अंजूम इरफान -अपक्ष,प्रभाग क्र.3 रेखा खंदारे -अपक्ष,निकिता खंदारे-अपक्ष,प्रभाग क्र.5 हणमंतराव कोष्टी -भाजपा,अनिल बोदाडे -अपक्ष,निलेश सुर्यवंशी -अपक्ष,निलेश सुर्यवंशी -भाजपा,सोनम मुढे -अपक्ष, प्रभाग क्र.6 संजय नलवडे-भाजपा,सुहास मुदगूल -अपक्ष,प्रभाग क्र.7 अश्विनी धोत्रे -अपक्ष,प्रभाग क्र.8 सोमनाथ हुशारे-भाजपा,राजामती कोंडुभैरी -अपक्ष,शरयू हजारे-अपक्ष,प्रभाग क्र.9 अनिता भोसले-अपक्ष,नंदा नाईकवाडी-शिवसेना उबाठा,शोभा हजारे-अपक्ष,रुबीनाबी इनामदार-अपक्ष,सुदर्शन यादव -भाजपा,प्रशांत यादव-नॅशनल काँग्रेस पार्टी (शरद पवार),मुझम्मील काझी-अपक्ष,प्रभाग क्र.10विक्रम शेंबडे-अपक्ष तीन अर्ज असे एकूण 24 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.दरम्यान सर्वाधिक प्रभाग क्र.9 मध्ये 7 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
मंगळवेढा नगरपालिका निवडणूक नगरसेवक पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना टिपलेले छायाचित्र

















