मंगळवेढा – ब्रम्हपुरी-मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावर एका मोटर सायकल स्वारास कार चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून पाठीमागून ठोकरल्याने मोटर सायकल स्वार बबु्रवाहन यशवंत सोनवले (वय 60, रा.ब्रम्हपुरी) हे जागीच ठार झाले. या प्रकरणी अज्ञात इनोव्हा कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी.यातील फिर्यादी किशोर सोनवले (वय 36,रा.ब्रम्हपुरी) याचे वडिल तथा मयत बब्रुवाहन सोनवले हे दि.9 रोजी एम.एच.13 डी.के.3511 होंडा शाईन मोटर सायकलवरुन मंगळवेढा येथे असलेल्या आपल्या लेकीला भेटावयास जात असताना ब्रम्हपुरी हद्दीतील इंडियन पेट्रोल पंपासमोरील पाटील वस्ती जवळ राष्ट्रीय महामार्गावरील लेनवर भरधाव वेगात येणार्या के.ए.48 एम.4205 या कार गाडीच्या चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात गाडी चालवून मोटर सायकल स्वारास पाठीमागून जोराची धडक देवून जखमी करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरुन दोन्ही वाहनाचे नुकसान केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान अपघातानंतर जखमीला उपचारास नेणे गरजेचे असताना तो कार चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले. याचा अधिक तपास पोलीस हवालदार नवले हे करीत आहेत.

















