सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम केलेले व युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव असणारे अनंत म्हेत्रे यांची दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली . काँग्रेसच्या खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनानुसार त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे ,दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी शहराध्यक्ष गणेश डोंगरे , माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी महापौर संजय हेमगड्डी, मंद्रुपचे राहुल म्हेत्रे ,राहुल भागवत, वागेश म्हेत्रे, नागनाथ नंदुरे, संदीप अडोळे, अमित देशमुख, महादेव पराणे, महेश स्वामी, ओंकार शेंडगे, संजय म्हेत्रे, महेश म्हेत्रे, ज्ञानदीप म्हेत्रे आदी उपस्थित होते. म्हेत्रे यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.


















