मोडनिंब – सोलापूर पुणे महामार्गावर मोडनिंब (ता.माढा) येथील उड्डाणपुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत शंभर फूट उंचीच्या हायमास्ट दिवा उभारण्यात आला आहे. परंतु अद्यापही विद्युतपुरवठा न झाल्याने तो चालू अवस्थेत नसल्यने मोठी अडचण झाली आहे. मोडनिंब येथे प्रवाशांना बसस्थानकात न सोडता उड्डाणपुलाजवळ अथवा रस्त्यावरच सोडून बस निघून जातात. या ठिकाणापासून मोडनिंब बसस्थानक एक-दीड किलोमीटर आहे. रात्री या रस्त्यावर काळोख असतो. अंधाऱ्या वाटेवरून महिला, मुलींसह ज्येष्ठांना जावे लागते. त्यामुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.या हायमास्टला तातडीने विद्युत जोडणी देण्यात यावी.अशी मागणी गिड्डे यांनी केली आहे.सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गालगत मोडनिंब उड्डाणपुलाजवळ सुमारे १३ लाख रुपये खर्च करून सात दिव्यांचा हायमास्ट चार महिन्यांपूर्वी उभारण्यात आला.
मोडनिंब स्टैंड, बसस्थानक, आदर्शनगर सर्व्हिस रोड, तसेच शेटफळ, बावी येथून मोडनिंब उमा विद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गासह आसपासचा मोठा परिसर या प्रकाशयोजनेच्या कव्हरेजमध्ये येणार आहे.रात्रीच्या वेळी या परिसरात मोठी वर्दळ असते. विशेषतः रात्री दहानंतर सोलापूर–पुणे महामार्गावरून मोडनिंब व परिसरातील महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक एसटीने येतात. मात्र रात्री आठनंतर बसस्थानकात कोणतीही बस न येणे आणि रात्रपाळीतील वाहतूक नियंत्रकही उपलब्ध नसणे यामुळे प्रवाशांना पुलाच्या झिरो पॉइंटपासून जास्त अंतर काळोखात पायी चालत जावे लागते.हायमास्टचे विजेअभावी अंधार कायम राहत असल्याने अपघातांचीही शक्यता वाढली आहे. त्यामुळे तातडीने विद्युतपुरवठा करून हायमास्ट सुरु करण्याची मागणी मनसेचे प्रशांत गिड्डे यांनी केली, असून नागरिकांमध्येही या संदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे.
हायमास्ट उभारला, पण अजूनही वीजजोडणी नाही.महामार्ग, प्रशासनाचा हा निष्काळजीपणा त्रासदायक आहे.अनेक महिला व नागरिक पहाटे फिरावयास येतात.त्यांना अंधाऱ्या वाटेवरून महिला, मुलींसह ज्येष्ठांना जावे लागते.
ऋषी कोठावळे
नागरिक


















