वळसंग : दि.१४ नोव्हेंबर रोजी वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील गोकुळ शुगर कारखाना, धोत्री येथे माननीय विलास यामावर (सो.), उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल डोंगरे यांनी भेट देऊन ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत ट्रॅक्टर चालकांना रिफ्लेक्टरचा वापर, ड्रिंक-ड्राईव्ह प्रतिबंध, वाहनांवर रिफ्लेक्टर टेप लावणे, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर बैठकीदरम्यान चालकांना खालील बाबींच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या:वाहनांवर रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे अनिवार्य,मद्यप्राशन करून वाहन चालवण्यास सक्त मनाई,रात्रीच्या वेळी लाईट, इंडिकेटर, रिफ्लेक्टर तपासून वापरणे,वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघात प्रतिबंध,अवैध पार्किंग, रिव्हर्स किंवा ओव्हरटेक टाळणे असे अनेक नियमांचे पालन करण्याची सूचना दिली.
या बैठकीस कारखान्याचे पदाधिकारी, तसेच ७० ते ७५ ऊस वाहतूक चालक व ट्राफिक अमलदार उपस्थित होते.


















